MSP होता, आहे आणि यापुढे राहणार आहे, त्यामुळे भ्रम पसरवू नका, अशा शब्दात सरकारची भुमिका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्ट केली.. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज राज्य सभेत बोलताना शेतकरी आंदोलनावर भाष्य केलं. यावेळी बोलताना मोदींनी विरोधकांवर टीकाही केली, विरोधकांचं कौतुकही केलं आणि सोबत येऊन काम करु, असं आवाहनही केलं.. शेतकऱ्यांना पुन्हा एकदा चर्चेसाठी पुढे येण्याचं आवाहन केलं, आंदोलन करणं योग्य नाही, शेतकऱ्यांनी पुढे येऊन चर्चा करावी, कृषिमंत्र्यांसोबत चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेतच, पण वयोवृद्ध लोकांना घेऊन आंदोलनात बसणं योग्य नाही. त्यामुळे आंदोलन संपवण्याची विनंती मोदींनी राज्यसभेत केलीय.. देशाला पुढे घेऊन जायचं आहे, कधीतरी सुधारणा कराव्या लागणार आहेत, चर्चा करावी, जे काही चांगलं होईल त्याचं श्रेय तुम्ही घ्या चूक झाली तर माझ्या माथी मारा पण सर्वांनी सोबत येऊन विस्तृत चर्चा असंही मोदी म्हणाले.
मोदींना उत्तर देताना शेतकरी नेते राकेश टिकैत म्हणाले की, 'किमान हमीभाव संपणार, असं आमचं म्हणणं नाहीये... MSP चा कायद्यात समावेश करावा असं आमचं म्हणणं आहे. याचा शेतऱ्यांना फायदा होईल.. MSP वर कायदा नसल्याने व्यापारी शेतकऱ्यांना लुटतात.. असं किसान युनियन राकेश टिकैत यांनी म्हटलंय. नवीन कृषी कायदे मागे घ्या आणि MSP ला कायद्यात आणा.. असंही ते म्हणाले,, आत्तापर्यंत किमान हमीभावावर कोणताही कायदा नाही करण्यात आलेला नाही... ज्या एमएसपीबाबत बोललं जातंय.. ती एमएसपी म्हणजे काय ते आपण पाहूया...
#lokmat #Indianews #MSP #NarendraModi #RakeshTikait #FarmersProtest
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat